सकाळची पहिली लघवी गडद पिवळी दिसते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात 'हे' जीवघेणे आजार
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, शरीरातील पाण्याची कमतरता, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय अनेक लोक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यामुळे छोटे आजार कालांतराने मोठे स्वरूप घेतात. त्यामुळे जीवघेण्या आजारांपासून शरीराचा बचाव करणे आवश्यक आहे. अनेकदा सकाळी उठल्यानंतर पहिल्या लघवीमध्ये वारंवार पिवळेपणा दिसू लागल्यास चिंता व्यक्त केली जाते तर काही लोक याकडे सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. पण शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता आणि इतर आजारांमुळे लघवीमध्ये सतत पिवळेपणा दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, आहारातील छोटे मोठे बदल, गोळ्या औषधांचे सेवन किंवा इतर समस्यांमुळे लघवीचा रंग बदलतो. लघवीचा रंग बदलणे ही सामान्य समस्या असली तरीसुद्धा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लघवीचा रंग कशामुळे बदलतो आणि यावर कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर डिहायड्रेट होण्याची जास्त शक्यता असते. कडक सूर्यप्रकाशाचा परिणाम आरोग्यावर देखील दिसून येतो. वाढत्या उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीरात उष्णता वाढते आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे लघवीचा रंग अतिशय गडद दिसू लागतो. लघवीच्या रंगात बदल झाल्यानंतर दुर्लक्ष न करता आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात थंडावा निर्माण होईल. डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जात नाही, त्यामुळे लघवीचा रंग बदलून पिवळा होतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी भरपूर पाणी पिऊन झोपावे.
अँटीबायोटिक्स, विटामिन बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स, लिव्हर किंवा किडनीच्या आजारांवरील औषधांचा परिणाम लघवीवर लगेच दिसून येतो. ज्यामुळे लघवीचा रसन्ग अतिशय गडद होऊन जातो. याशिवाय शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे लघवीचा रंग बदलतो. ही समस्या वारंवार उद्भवू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्यावे.
दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात जंक फूड किंवा कोल्डींक्सचे अतिसेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बीट, गाजर, केशरयुक्त पदार्थ, जास्त प्रमाणात विटामिन बी किंवा अति प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीचा रंग गडद होऊन जातो. शरीराचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पोषक घटकांचे आणि द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.