कोलेस्ट्रॉलचा धोका वाढू नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थाचे सेवन
उन्हाळा ऋतू सुरु झाल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्या वाढू लागते. याशिवाय या दिवसांमध्ये हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल आणि हृद्यासंबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीराची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिजे निघून जातात. तसेच रक्तदाब असंतुलित होऊन जातो. रक्तदाब कमी झाल्यानंतर किंवा वाढल्यानंतर शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराचे कार्य निरोगी राहील अशाच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीराचा वाढलेला कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक येण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात हार्ट अटॅक आणि इतर गंभीर समस्यांपासून शरीराचा बचाव पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात थंडावा राहतो.(फोटो सौजन्य – iStock)
लघवी करताना आग होते? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तात्काळ मिळेल आराम, मुतखडा पडेल लघवीतून बाहेर
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. कलिंगड खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळामध्ये ९० टक्के पाणी असते. ज्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीर हायड्रेट राहते. कलिंगडमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय यामध्ये पोटॅशियम आणि अमिनो ऍसिड शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडचे नियमित सेवन करावे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदाम खाल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते. याशिवाय शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बदामामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात. तसेच बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यां मजबूत करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम खावेत.
अळशीच्या बियांचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीराचे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. रक्तदाब वाढू नये म्हणून अळशीच्या बियांचे किंवा पाण्याचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. त्यात तुम्ही अळशीच्या बियांचे पाणी, लाडू किंवा स्मूदी बनवून पिऊ शकता.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल कच्ची पपई, नियमित सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो खाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. यामध्ये लायकोपीन घटक भरपूर प्रमाणात आढळून येतो. चवीला आंबट असलेल्या टोमॅटोचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृद्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.