Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमझानदरम्यान शर्करेच्‍या पातळ्या संतुलित कसे ठेवायचे? मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी काही टिप्स

रमझानच्या महिन्यात उपवासादरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या संतुलित राखणे संभाव्‍य चढ-उतारांमुळे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. रमजानदरम्यान त्या पातळ्या संतुलित कसे ठेवायचे? असा प्रश्न पडला असेल. सविस्तर माहिती...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 20, 2025 | 11:55 AM
रमझानदरम्यान शर्करेच्‍या पातळ्या संतुलित कसे ठेवायचे? मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी काही टिप्स (फोटो सौजन्य- istock)

रमझानदरम्यान शर्करेच्‍या पातळ्या संतुलित कसे ठेवायचे? मधुमेहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी काही टिप्स (फोटो सौजन्य- istock)

Follow Us
Close
Follow Us:

रोजा व नमाज आणि सामुदायिक बंधनाचा महिना रमझान जवळ आला आहे. अनेकजण हा महिनाभर उपवास करतात आणि रोजा व नमाजचे पालन करतात. पण मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी या पवित्र महिन्‍यादरम्‍यान अधिक काळजी घेण्‍याची आणि नियोजन करण्‍याची गरज आहे. योग्‍य माहितीसह ते त्‍यांचा उपवास कार्यक्षमपणे पार पाडू शकतात आणि त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत चिंता न करता या पवित्र महिन्‍याच्‍या रोजामध्‍ये सहभाग घेऊ शकतात.

पहाटेपूर्वीच्‍या सुहूरपासून सूर्यास्‍तनंतरच्‍या इफ्तारपर्यंत उपवासादरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या संतुलित राखणे संभाव्‍य चढ-उतारांमुळे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. म्‍हणून, सुहूर व इफ्तार महत्त्वपूर्ण भोजन असले तरी त्‍यामधून ऊर्जा व पोषण मिळणे आवश्‍यक आहे. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी या काळात रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमधील मोठ्या परिवर्तनांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी काळजीपूर्वक आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

योग्‍य पौष्टिक आहाराव्‍यतिरिक्‍त रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍याची देखील शिफारस केली जाते. कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्‍यासाठी सोईस्‍कर व वेदना-मुक्‍त मार्ग आहे. संतुलित आहाराचे सेवन व नियमितपणे ग्‍लुकोज मॉनिटरिंगसह मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍ती सुरक्षितपणे उपवास करू शकतात आणि या पवित्र महिन्‍यादरम्‍यान त्‍यांचे आरोग्‍य उत्तम ठेवू शकतात.

सध्‍या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे डीआरएनबी एण्‍डोक्रिनोलॉजी करत असलेले एमबीबीएस, डीएनबी (जनरल मेडिसीन) डॉ. प्रथमेश देवरूखकर म्‍हणाले, ”कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) रमजानदरम्‍यान उपवास करणाऱ्या मधुमेही व्‍यक्‍तींसाठी महत्‍वपूर्ण आहे. सीजीएम देणारा रिअल-टाइम ब्‍लड शुगर डेटा उपवासापूर्वी व उपवासानंतर आहारामुळे ग्‍लुकोजमधील चढ-उतार ओळखण्‍यास आणि त्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करतो. हा डेटा-संचालित दृष्टिकोन आहाराचे प्रमाण, आहाराची वेळ आणि व्‍यायामाचे समायोजन करण्‍यास मदत करतो, ज्‍यामुळे रक्‍तातील शर्करेवर उत्तम नियंत्रण राहते आणि आत्‍मविश्‍वास येतो.”

यंदा रमझानदरम्‍यान मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी खाली काही टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत:
1. नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करा: विशेषत: रमझानदरम्यान मधुमेहाच्‍या योग्‍य व्‍यवस्‍थापनासाठी नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची तपासणी करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. फ्री स्‍टाइल लिब्रे सारखे कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉन्टिरिंग डिवाईसेस रिअल-टाइम डेटा देतात, तसेच सिंगल-टाइम रिडिंग्‍ज ऐवजी ब्‍लड शुगर ट्रेण्‍ड्सचे परिपूर्ण दृश्‍य देतात. हा डेटा सहजपणे स्‍मार्टफोनवर देखील उपलब्‍ध होतो, ज्‍यामुळे आहार, शारीरिक व्‍यायाम व उपचारासंदर्भात निर्णय घेणे सोपे होऊ शकते.

2. इफ्तारदरम्‍यान शरीराला उत्तम पोषण द्या: प्रथेनुसार खजूर व फळांचे सेवन करत उपवास सोडला जातो, ज्‍यानंतर पौष्टिक व संतुलित आहाराचे सेवन केले जाते. भरपूर पाणी पित स्‍वत:ला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे आणि उच्‍च कॅफिन असलेले किंवा साखरयुक्‍त पेये जसे कॉफी, चहा व शीतपेये पिणे टाळा. कर्बोदके, प्रथिने व फॅट्सचे योग्‍य संतुलन असलेला संतुलित आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. ओट्स, मल्टीग्रेन ब्रेड, भाज्या आणि मसूर (डाळ) यांसारख्‍या पिष्‍टमय पदार्थांचे, तसेच प्रथिनांचे स्रोत असलेले मासे, टोफू आणि काजू यांचे सेवन करा, ज्‍यामुळे उर्जेची पातळी आणि एकूण आरोग्य उत्तम राहिल.

3. शारीरिक व्‍यायाम महत्त्वाचा: विशेषत: रमझानदरम्‍यान मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी शारीरिक व्‍यायाम योग्‍य पोषणाइतकाच महत्त्वाचा आहे. उपवासादरम्‍यान विशेषत: उपवास सोडण्‍याच्‍या शेवटच्‍या काही तासांदरम्‍यान अतिप्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. त्‍याऐवजी, फिटनेस राखण्‍यासाठी आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी जवळपास ३० मिनिटांसाठी चालणे किंवा योग करणे यांसारखा हलक्‍या स्‍वरूपाचा व्‍यायाम करा.

4. झोपेच्‍या वेळापत्रकामध्‍ये सुधारणा करा: रमझानदरम्‍यान अनेकदा मित्र व कुटुंबियांसोबत रात्री उशिरापर्यंत वेळ व्‍यतित केला जातो. पण, आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी पुरेशी व योग्‍य प्रमाणात झोप घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे झोप कमी होण्‍याच्‍या प्रमाणाला देखील प्रतिबंध होण्‍यास मदत होते, ज्‍याचा भूकेवर नकारात्‍मक परिणाम होऊ शकतो. तसेच रोगप्रतिकारशक्‍ती, चयापचयाला साह्य करण्‍यासाठी आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे नियमन करण्‍यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते, ज्‍यामुळे मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनामध्‍ये पुरेशी झोप मिळणे आवश्‍यक आहे.

नियोजन करत, आरोग्‍यदायी आहार निवडी करत आणि आरोग्‍याची काळजी घेत मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते आणि यंदा रमझानचा आनंद घेता येऊ शकतो.

Web Title: How to keep sugar levels balanced during ramadan some tips to manage diabetes effectively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • diabetes
  • Ramadan Eid

संबंधित बातम्या

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
1

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
2

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब
3

Diabetes Symptoms: मधुमेह झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीरातील अवयव होतील खराब

रक्तात वाढलेल्या इंचभर साखरेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! जीवनशैलीतील ‘या’ सवयी वाचवतील जीव
4

रक्तात वाढलेल्या इंचभर साखरेमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका! जीवनशैलीतील ‘या’ सवयी वाचवतील जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.