वेट लॉस करण्यासाठी काय करावे
आजकाल प्रत्येकालाच वजन कमी करण्याचे वेड लागले आहे. वजन कमी करण्याच्या विविध पद्धती आणि आहार योजना सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) देखील आता वजन कमी करण्यात तुमची मदत करू शकते? हो तुम्ही योग्य वाचलं आहे.
अलीकडेच, AI चॅटबॉटचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका युजरने चॅटबॉटला विचारले की 1 महिन्यात 5 किलो वजन कसे कमी करता येईल? या प्रश्नाच्या उत्तरात AI ने सांगितले की 1 महिन्यात 5 किलो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 5 किलो वजन उचलावे लागेल. हे उत्तर ऐकून त्यावेळी युजरलादेखील आपले हसू आवरता आले नाही. (फोटो सौजन्य – iStock)
काय होतं AI चं उत्तर
युजरने हसून विचारल्यानंतर AI ने सांगितले की, ठीक आहे, मग तुला काय हवे होते? जादूची काठी? वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल.
लोकांना AI चे हे उत्तर खूप आवडले आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. तथापि, हे देखील खरे आहे की वजन कमी करण्यासाठी केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत यासाठी तुमच्या आहारात बदल करून नियमित व्यायाम करण्याचीदेखील गरज भासते हे तितकेच खरं आहे.
हेदेखील वाचा – केवळ पाणी पिऊन 21 दिवसात केलं 13 किलो वजन कमी, वॉटर फास्टिंग करणं कितपत योग्य
कॅलरीजचे सेवन कमी करा
कमी कॅलरीयुक्त आहार घ्या
वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कॅलरीजचे प्रमाण कमी करणे. याचा अर्थ असा आहे की आपण बर्न करण्यापेक्षा कमी कॅलरी वापरल्या पाहिजेत. कमी कॅलरी खाल्ल्यास चरबी साठणार नाही आणि वजन वाढणार नाही.
निरोगी आहार घ्या
सकस आहाराची गरज
आपल्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समाविष्ट करा. जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये टाळा. यामुळे लवकर वजन वाढते. त्यामुळे वजन वाढू द्यायचे नसेल अथवा त्वरीत कमी करायचे असेल तर तुम्ही निरोगी आहारावर अधिक भर द्या.
हेदेखील वाचा – 1 किलो वजन कमी करण्यासाठी रोज इतक्या किलोमीटरने धावाल तरच विरघळेल शरीराची चरबी
नियमित व्यायाम करा
रोज न विसरता व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही रोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यामध्ये रोज सकाळी वा संध्याकाळी चालणे, धावणे, दोरीच्या उड्या मारणे, स्विमिंग करणे यासारख्या व्यायामाचा तुम्ही आधार घेऊ शकता. तसंच जिममध्ये जाऊनदेखील मार्गदर्शन घेत व्यायाम न चुकता करू शकता.
खूप पाणी प्या
दिवसभर पाणी पित राहा
पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खाता. याशिवाय पाणी शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. जास्त पाणी पित राहिल्यास शरीरामध्ये चरबी साठत नाही आणि त्यामुळे जाडीदेखील वाढत नाही. त्यामुळे रोज किमान 3-4 लीटर तरी पाणी प्यावे.
पण लक्षात ठेवा की वजन कमी करण्यासाठी संयम आणि समर्पण आवश्यक आहे. वजन कमी करणे मनावर घ्या आणि तंदुरूस्त राहा.