
विकतचे च्यवनप्राश आणून खाण्यापेक्षा घरी पारंपरिक पद्धतीने बनवा आवळ्याचे च्वनप्राश
थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकून ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कधी काढा प्यायला जातो तर कधी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. तसेच लहान मुलांना च्वनप्राश खाण्यास दिले जाते. वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले च्वनप्राश शरीरासाठो अतिशय प्रभावी आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा च्वनप्राश खाल्ल्यास महिनाभरात शरीरात अनेक महत्वपूर्ण बदल दिसून येतील. लाडू, विविध फळे, खारीक, खोबऱ्यांसह बाजारात गाजर, हरभरे, तुरई, मटार, मुळा, बीट, आवळे इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ भाज्या उपलब्ध असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचे च्वनप्राश बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते.यामध्ये विटामिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कायमच च्वनप्राश बाजारातून विकत आणले जाते. विकत आणलेल्या पदार्थांमध्ये काही प्रमाणात केमिकल आणि प्रक्रिया करून स्टोर केलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. अशा पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घ्या सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचे च्वनप्राश बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?