
तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास
बऱ्याचदा जेवल्यानंतर किंवा बोलताना काहींच्या तोंडाला खूप जास्त दुर्गंधी येते. दातांमध्ये साचून राहिलेले अन्नपदार्थांचे कण कुजल्यामुळे तोंडाला सतत घाण वास येतो. तोंडाला येणाऱ्या वासामुळे चारचौघांमध्ये हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटते. याशिवाय काहीवेळा आत्मविश्वास कमी होऊन जातो. अशावेळी मुखवास खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळ्यापासून मुखवास बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. आवळा खाणे शरीरासाठी सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले विटामिन सी, फायबर आणि इतर आवश्यक गुणकारी गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर ठरतात. जेवल्यानंतर थोडासा आवळ्याचा मुखवास खाल्ल्यास पचनसंस्था सुधारते, तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. याशिवाय आवळा खाल्ल्यामुळे केस आणि त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसू लागतात. केसांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एक चमचा मुखवास खाल्ल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम दिसून येतील. जेवणानंतर बऱ्याचदा शरीराची पचनक्रिया मंदावते, अशावेळी मुखवास खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि अपचनाचा त्रास होत नाही. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा मुखवास बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय