Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रव्याचा शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा

अनेकदा डॉक्टर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्ल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित एक सफरचंद खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, तसेच शरीराला ऊर्जा मिळतो. नुसतंच सफरचंद खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर सफरचंद शिरा नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 01, 2024 | 12:03 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा

सोप्या पद्धतीमध्ये बनवा सफरचंद शिरा

Follow Us
Follow Us:

घरी कोणी पाहुणे आल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर रव्याचा शिरा किंवा शेवयांची खीर इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सफरचंद शिरा बनवू शकता. सफरचंद शिरा बनवण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो आणि घाईगडबडीच्या वेळी तुम्ही हा शिरा बनवू शकता. सफरचंद आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहेत. सफरचंदमध्ये असलेले फायबर शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतात. तसेच नियमित सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सफरचंद शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • सफरचंद
  • तूप
  • साखर
  • रवा
  • काजू, बदाम तुकडे
  • वेलची पावडर
  • दूध
  • केशर
  • चारोळी
हे देखील वाचा:१० मिनिटांमध्ये बनवा वाटीभर रव्याचे पौष्टिक आप्पे, वाचा सोपी रेसिपी 

कृती:

  • सफरचंद शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात सफरचंदाचे बारीक तुकडे टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात साखर आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्या. साखर व्यवस्थित वितळेपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवा.
  • अशापद्धतीने सफरचंद सिरप तयार झाल्यानंतर काढून घ्या.
  • कढईमध्ये पुन्हा एकदा तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा भाजण्यासाठी टाका.
  • रवा भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध घालून शिरा शिजण्यासाठी ठेवा.
  • नंतर त्यात सफरचंद सिरप टाकून मिक्स करा. नंतर त्यात काजू,बदामाचे तुकडे टाकून मिक्स करून घ्या.
  • अशा पद्धतीने तयार आहे सफरचंदाचा शिरा.

Web Title: How to make apple sheera at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी
1

Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
3

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
4

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.