
मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
Cake At Home: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर कायमच विकतचे चविष्ट पदार्थ आणून खाल्ले जातात. त्यातील लहान मुलांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे केक. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक उपलब्ध आहेत. पण कायमच विकतचा केके खाण्याऐवजी घरी बनवलेला हेल्दी आणि टेस्टी खावा. म्हणूच आज आम्ही तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत हेल्दी आणि टेस्टी केक बनवू शकता. वांरवार मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघाडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात कमीत कमी मैद्याचा समावेश करावा. पचनक्रिया बिघडणे आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवल्यानंतर शारिरीक आरोग्य बिघाडून जाते. त्यामुळे आहारात ज्वारीच्या पिठाचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठापासून केक बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)