
सकाळच्या नाश्त्यासाठी वाटीभर बाजरीच्या पिठापासून बनवा हेल्दी टेस्टी बाजरीचे धिरडे
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी खायला हवे असते. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. कायमच नाश्त्यात बाहेरील विकतचे पदार्थ खाल्ले जातात. पण सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. बाजरीच्या पिठात असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारतात. याशिवाय धिरडे बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. घाईगडबडीच्या वेळी पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवू शकता. जाणून घ्या बाजरीच्या पिठाचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा टपरीवर मिळतो तसा चविष्ट उकाळा