संक्रांतीला घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये पारंपरिक बाजरीच्या पिठाचे गोड वडे
संपूर्ण भारतामध्ये 14 जानेवारीला मोठ्या आनंद आणि उत्साहात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथे असलेल्या परंपरेनुसार साजरी केली जाते. शिवाय यादिवशी अनेक महिला काळ्या रंगाची साडी नेसून छान तय्यार होऊन मकर संक्रांती पूजेसाठी जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक ठिकाणी हळदीकुंकूचे आयोजन केले जाते. शिवाय हळदीकुंकूच्या दिवशी तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या राज्याच्या परंपरेनुसार सण साजरा केले जातात. अनेक ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी बाजरीचे गोड वडे बनवले जातात. थंडीच्या दिवशी आहारात बाजरी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बाजरीमध्ये प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही बाजरीच्या पदार्थांचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया बाजरीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा