Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज, हॉटेलच्या भाजीपेक्षा लागेल भारी चव

रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स व्हेज भाजी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या मिक्स व्हेज बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 08, 2026 | 02:25 PM
१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज

१० मिनिटांमध्ये रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मिक्स व्हेज

Follow Us
Follow Us:

घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर किंवा चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरातील सगळेच बाहेर जेवायला जातात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पंजाबी, नॉर्थ इंडियन आणि चायनीज पदार्थ प्रामुख्याने मागवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच बाहेरील जेवण जेवायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच हॉटेलमधील तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेला पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल मिक्स व्हेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मिक्स व्हेज भाजी तुम्ही चपाती, भाकरी, पुरी आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. भाजीमध्ये तुम्ही लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ सुद्धा टाकू शकता. लहान मुलं बऱ्याचदा भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांसाठी तुम्ही मिक्स व्हेज किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून मिक्स व्हेज भाजी बनवू शकता. या पदार्थाची चव चाखून घरातील सगळेच तुमचं कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

दिवसाची सुरुवात करा चमचमीत पदार्थाने! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बटाटा, फ्लॉवर, सिमला मिरची, मटार आणि गाजर
  • पनीर
  • काजू
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • कांदा
  • टोमॅटो
  • आलं लसूण पेस्ट
    जिरं पावडर
  • कसुरी मेथी
  • किचन किंग मसाला
  • मीठ
  • फ्रेश क्रीम
पारंपरिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ

कृती:

  • मिक्स व्हेज बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ साफ करून काहीवेळ मिठाच्या पाण्यात भिजण्यासाठी ठेवा.
  • कढई गरम करून त्यात तेल टाका. गरम तेलात कांदे, टोमॅटो आणि काजू लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर थंड करून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद, किचन किंग मसाला, कसूरी मेथी, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि तयार केलेली कांद्याची पेस्ट घालून व्यवस्थित भाजा.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात स्वच्छ करून घेतलेल्या भाज्या आणि पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
    भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर त्यात फ्रेश क्रीम घालून गॅस बंद करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मिक्स व्हेज भाजी.

Web Title: How to make restaurant style mix veg at home simple food recipe restaurant style mix veg recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.