
नाश्त्यासाठी बनवा सातूच्या पिठाची टिक्की, वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ
जगभरात वाढलेल्या वजनाने असंख्य लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, वाईट कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांची लागण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कायमच वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. शरीरावर अनावश्यक चरबीचा घेर वाढल्यानंतर चालताना किंवा खाली बसताना खूप जास्त त्रास होतो. याशिवाय काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारती उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते.तर काही महिला गोळ्या, तासनतास व्यायाम आणि डाएट फॉलो करतात.मात्र चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीराला गंभीर आजार होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सातूच्या पिठाची टिक्कीचे सेवन तुम्ही करू शकता. सातूच्या पिठाची टिक्की चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे. बिहारमध्ये सातूचे पीठ शरीरासाठी हाय प्रोटीन मानले जाते. जाणून घ्या सातूच्या पिठाची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)