
१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न कायमच सगळ्यांना पडत असतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. मटारपासून कायमच भाजी, कटलेट किंवा मटार पनीर बनवून खाल्लेले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मटार पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी राहू नये. नाश्ता केल्यामुळे दुपारी लवकर भूक लागत नाही. मटार शरीरासाठी पौष्टिक आहेत. त्यामुळे आहारात मटारपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मटार पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश