Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात किंवा इतर वेळी खाण्यासाठी तुम्ही गावरान पद्धतीमध्ये पावटा भात बनवू शकता. हा पदार्थ हिवाळ्यात अनेक ठिकाणी बनवला जातो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 09, 2026 | 08:00 AM
थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात

Follow Us
Follow Us:

देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात अनेक वेगवेगळ्या पदार्थांची रंगतदार मेजवानी बनवली जाते. पण नेहमीच डाळभात किंवा तोच ठराविक पुलाव भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट पावटा भात बनवू शकता. या भातात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता. गरमागरम चवीचा पावटा भात जर जेवणात असेल तर चार घास जास्त जातात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पावटे उपलब्ध असतात. पावट्यांपासून आमटी, भाजी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. हा भात तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पावटा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

दिवसाची सुरुवात करा चमचमीत पदार्थाने! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • ओल्या पावट्याच्या शेंगा
  • कांदा
  • टोमॅटो
  • पुलाव मसाला
  • तांदूळ
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • मोहरी, जिरं
  • कढीपत्ता
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • मिक्स भाज्या
  • ओल खोबर
  • कोथिंबीर
हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

कृती:

  • पावटा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, पावट्याची साल काढून दाणे काहीवेळ पाण्यात ठेवा.
  • कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने आणि कांदा, टोमॅटो घालून मिक्स करा.
  • कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकावे. यामुळे कांदा टोमॅटो लवकर शिजेल. कांदा शिजल्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला, पुलाव मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. मसाले शिजल्यानंतर त्यात
  • तुमच्या आवडीनुसार कोणत्याही मिक्स भाज्या आणि भिजवलेले पावटे घालून मिक्स करा.
  • भाज्या ५० टक्के शिजल्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि भात शिजण्यासाठी ठेवा.
  • भात व्यवस्थित शिजल्यानंतर वरून ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गावरान पावट्याचा भात.

Web Title: How to make gavran pavta bhat at home simple food recipe satara special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.