Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

Potato Puff Pastry Recipe : बेकरीमध्ये मिळणारी खुसखुशीत आणि बटाट्याच्या स्टफिंगने भरलेली आलू पफ पेस्ट्री अनेकांना खायला फार आवडते, चला तर मग ही डिश घरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2025 | 09:30 AM
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार 'आलू पफ पेस्ट्री' घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार 'आलू पफ पेस्ट्री' घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

आजच्या आधुनिक जीवनशैलीत चहा–कॉफी सोबत पटकन खाता येईल असे स्नॅक्स लोकांना आवडतात. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गरमागरम चहाबरोबर कुरकुरीत स्नॅक्स मिळाले, की दुपार किंवा संध्याकाळ आनंदी होते. अशा स्नॅक्सपैकी एक खास लोकप्रिय डिश म्हणजे पफ पेस्ट्री. ही डिश मूळतः परदेशातून आली असली तरी आता भारतात आणि विशेषतः शहरांमध्ये ती खूप लोकप्रिय झाली आहे.

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

पफ पेस्ट्री वेगवेगळ्या प्रकारात बनवली जाते. वेज, नॉनव्हेज, चीज पफ, पॅटीस, क्रोइसाँ इत्यादी. यात भरलेले स्टफिंग डिशची खरी चव ठरवते. त्यामध्ये आलू पफ पेस्ट्री म्हणजेच मसालेदार बटाट्याच्या सारणाची भर घालून तयार केलेली पेस्ट्री अतिशय चवदार लागते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर मसालेदार सारण असलेली ही डिश मुलांना, मोठ्यांना आणि पाहुण्यांनाही आवडते. बाजारातील पफ पेस्ट्री नक्कीच आवडतात, पण घरी केलेल्या पेस्ट्रीची मजाच काही और असते. त्यामुळे आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तयार करता येणारी आलू पफ पेस्ट्री रेसिपी.

साहित्य

स्टफिंगसाठी

  • ३-४ उकडलेले बटाटे
  • १ कांदा (बारीक चिरलेला)
  • २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • ½ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • ¼ टीस्पून हळद
  • ½ टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • २ टेबलस्पून तेल
  • थोडी कोथिंबीर
पेस्ट्रीसाठी
  • रेडीमेड पफ पेस्ट्री शीट्स (बाजारातून मिळतात)
    (जर घरी बनवायची असेल तर मैदा, बटर आणि थंड पाणी वापरून बनवू शकता, पण थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे.)
  • थोडेसे दूध किंवा अंड्याचा बलक (ब्रशिंगसाठी)
वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतावा. तो हलका गुलाबी झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालून परतावे.
  • नंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकावा.
  • उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत. मीठ आणि कोथिंबीर घालून सारण मिक्स करून तयार करावे.
  • बाजारातून घेतलेल्या पफ पेस्ट्री शीट्स फ्रीजमधून काढून १० मिनिटं रूम टेम्परेचरला ठेवाव्यात.
  • मग त्या हलक्या हाताने लाटून चौकोनी किंवा आयताकृती तुकडे करून घ्यावेत.
  • प्रत्येक शीटच्या मध्ये थोडे आलूचे सारण ठेवावे.
  • शीट दुमडून कडा काट्याने दाबून बंद कराव्यात जेणेकरून आतले सारण बाहेर येणार नाही.
  • प्रत्येक पफवर हलकेसे दूध किंवा अंड्याचा बलक ब्रशने लावावा. यामुळे पफ सोनेरी रंगाचे अन् चमकदार दिसतात.
  • ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घ्यावा.
  • तयार पफ ट्रेमध्ये ठेवून २०–२५ मिनिटं बेक करावे.
  • पफ वरून सोनेरी, कुरकुरीत आणि आतून फुललेले दिसले की ते तयार आहेत.
  • गरमागरम आलू पफ पेस्ट्री टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.
  • पेस्ट्री आणखी चवदार करायची असेल तर स्टफिंगमध्ये उकडलेले मटार किंवा गाजर घालू शकता.
  • अंड्याचा बलक न वापरायचा असेल तर दूध किंवा बटर ब्रश करू शकता.

Web Title: How to make bakery style crispy and tasty potato puff pastry at home learn the perfect recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट
2

Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.