अंगारखी चतुर्थीनिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट केळीचे मोदक
श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सण उत्सव असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो.याशिवाय गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक १० दिवसांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. आज संपूर्ण राज्यभरात अंगारखी चतुर्थी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जात आहे. श्रावण महिन्यात पहिल्यांदाच अंगारखी चतुर्थी आल्यामुळे सगळीकडे एक वेगळाच उत्साह आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये केळीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही उकडीचे मोदक, गव्हाचे मोदक किंवा इतर गुलकंद मोदक खाल्ले असतील पण आज आम्ही तुम्हाला केळीची मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले पोटॅशियम शरीराला पोषण देते. चला तर जाणून घेऊया केळीचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य –pinterest)
दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्यासाठी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड, नोट करा रेसिपी