१० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी पनीर सॅलड बनवू शकता. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वाढलेले वजन कमी करताना आहारात तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पनीर खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. कायमच हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. सॅलड बनवताना त्यात तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया पनीर सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
रेस्टॉरंट स्टाईल Honey Chili Potato आता घरीच बनवा; तुमच्या पार्टीची शान वाढवेल ही रेसिपी!