
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं
सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास सगळ्यांचं हवे असतात. बऱ्याचदा सकाळचा नाश्ता बाहेरून विकत आणून खाल्ला जातो. मेदुवडा, वडापाव, सामोसा इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. याशिवाय अपचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पण अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमच हेल्दी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये ताकातलं धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. याशिवाय धिरडं खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. ताक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. जाणून घ्या ताकातलं धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दोडक्याची साल फेकून देता? मग पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सालींची सुकी चटणी, नोट करून घ्या रेसिपी