
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत कोबीचे थालीपीठ
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. भाज्यांचे नाव ऐकल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्यास नकार देतात. पण दैनंदिन आहारात भाज्यांचे सेवन न केल्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे आहारात सर्वच पदार्थांचे आवडीने सेवन करावे. कोबीची भाजी पाहिल्यानंतर मुलं कायमच नकार देतात. ही भाजी अनेकांना खायला अजिबात आवडत नाही. कोबीच्या भाजीचा उग्र वास आणि पांचट चवीमुळे भाजी खाल्ली जात नाही. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर आढळून येते. फायबरयुक्त भाज्यांचे आहारात सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी कोबीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय थालीपीठ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया कोबी थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
तोंडाला पाणी आणणारी दही पापडी चाट घरी कशी बनवायची? आजच नोट करा हलवाईवाली रेसिपी