भाजलेल्या चण्याचे लाडू
वाढत्या वयानुसार शरीरातील हाडांचे दुखणे वाढू लागते. वय वाढल्यानंतर महिला आणि पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. पण सार्वधिक बदल हे महिलांच्या शरीरामध्ये होतात. त्यामुळे विशेष करून महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे बिघडलेले हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात भाजलेले चणे आणि शेंगदाण्याचा समावेश करावा. भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच चण्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, विटामिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पॉलिफेनॉल्स, फायटोन्युट्रिएंट्स, बिटाकॅरोटीन यांसारखे गुणधर्म सुद्धा चण्यांमध्ये असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चण्यांपासून पौष्टिक लाडू कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेले लाडू घरातील सगळेच आवडीने खातील.
हे देखील वाचा: वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी, नाश्त्यामध्ये करा हरभऱ्याच्या सॅलेडचा समावेश