
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच शरीराला पचन होणारे हलके पदार्थ खावेत. कारण नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अनेक लोक वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. नेहमीच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात चिजी कॉर्न बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याशिवाय कमीत कमी साहित्यामध्ये झटपट पदार्थ तयार होतो. उकडलेला मका लहान मुलांच्या आरोग्यासाठी प्रभावी आहे. यामध्ये असलेले विटामिन्समुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि शरीराला फायदे होतात. चला तर जाणून घेऊया चिजी कॉर्न बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी