सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कायमच आनंदी आणि उत्साहाने व्हावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. कारण सकाळ आनंदात झाली तर संपूर्ण दिवस सुद्धा आनंदात जातो. उठल्यानंतर प्रत्येकालाच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीसोबत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. नाश्त्यात खाल्ले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ संपूर्ण दिवस शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात. त्यामुळे नाश्त्यात कायमच सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सॅलड लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल. अनेकांना बटाटा खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी बटाट्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी मुलांना खाण्यास देऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळेल. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी