नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा किंवा मेदुवडा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. याशिवाय लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बटाट्याचा चिल्ला तुम्ही देऊ शकता. सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यात काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी बटाट्याचा चिल्ला अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावेत. अतितिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्यास मुलांना देऊ नये. चला तर जाणून घ्या बटाट्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सीफूड लव्हर्स ही रेसिपी तुमच्यासाठीच! झणझणीत चवीची ‘कोळंबी करी’ घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी