Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे सॅलड, ३० दिवसांमध्ये होईल वजन कमी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी ३० दिवस नियमित काकडीचे सॅलड खाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. याशिवाय पोटाचा घेर कमी होईल. काकडीचे सॅलड खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. जाणून घ्या काकडी सॅलड बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2025 | 03:00 PM
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे सॅलड

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे सॅलड

Follow Us
Close
Follow Us:

वाढलेले वजन शरीरासाठी अतिशय घातक आहे. कारण शरीरावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय वजन वाढल्यानंतर बऱ्याचदा महिलांना नेमके कोणते कपडे परिधान करावे? सीव्हील्स घातल्यानंतर शरीरावर वाढलेली चरबी दिसणार तर नाहीना? असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीनशेक, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात काकडीचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले काकडी सॅलड नियमित 30 दिवस खाल्यास शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच, लहान मुलं होतील खुश

साहित्य:

  • शिजवलेले काळे चणे
  • दही
  • काकडी
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • चाट मसाला
  • मीठ
  • मक्याचे दाणे
  • पुदिन्याची पान
  • जिऱ्याची पावडर
  • ओरिगानो
  • मध
  • लिंबाचा रस

रविवार होईल आणखीनच स्पेशल! दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काकडीचे सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून साल काढून त्याचे गोलाकार तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर मोठ्या बाऊलमध्ये दही घेऊन त्यात चाट मसाला, जिऱ्याची पावडर, काळ मीठ आणि ओरिगानो टाकून मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात उभा लांब कापलेला कांदा, शिजवलेले काळे चणे, काकडीचे स्लाइस, मक्याचे दाणे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि पुदिन्याची पाने टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर वरून मध आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी टेस्टी काकडीचे सॅलड.
  • सकाळच्या नाश्त्यात नियमित काकडीच्या सॅलडचे सेवन केल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.

Web Title: How to make cucumber salad at home weight loss recipe weight loss remedies healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी
1

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी
2

रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी
3

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस
4

कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा काकडीचा गोड धोंडस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.