दुपारच्या जेवणात बनवा चमचमीत पनीर चीज टिक्की
रविवारच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी नेमकं काय बनवावं हे सुचत नाही. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना खिन्न नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच बाहेरून विकत आणलेली पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पोषक आणि चवदार पदार्थ खावेत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. पनीर खाल्यामुळे पोटही भरते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक आहारात पनीरचा समावेश करतात. कारण पनीर खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर चीज टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहे. या पद्धतीने पनीर चीज टिक्की बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. (फोटो सौजन्य – iStock)
रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या रेसिपी
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट, नोट करून घ्या सिंपल रेसिपी