जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा शेवगा फ्राय
दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात अनेक घरांमध्ये नेहमी डाळ, भात, चपाती, भाजी, लोणचं, गोड पदार्थ, भजी इत्यादी अनेक चमकचमीत पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी आहारात तेलकट तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना साधे सोपे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेवगा फ्राय बनवू शकता. नेहमीच तेलकट तिखट पदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलकट पदार्थांचेकमी सेवन करावे. आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय पौष्टिक आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले पोषक घटक कॅल्शियम वाढवण्यासाठी मदत करतात. रोजच्या जेवणात ओली चटणी, मुरांबा, लोणची, पापड हे पदार्थ तोंडी लावण्यासाठी बनवले जातात. मात्र 10 मिनिटांमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा फ्राय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
चमचाभर बडीशेप आणि खडीसाखरेचा वापर करून उन्हाळ्यात बनवा थंडगार सरबत, उष्णता होईल कमी