वरणभात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी
रोजच्या आहारात भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी नेहमी नेहमी काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कच्च्या टोमॅटोची चटणी बनवू शकता. कच्च्या टोमॅटोचा वापर जेवण बनवताना केला जातो. याआधी तुम्ही शेंगदाणे, खोबरं किंवा इतर पदार्थांपासून बनवलेली चटणी खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवावी याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडबडीमध्ये भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर तुम्ही चटणी बनवू शकता. ही चटणी दोन ते तीन दिवस सहज टिकून राहते. डाळ भात किंवा भाकरी बनवल्यानंतर तुम्ही तोंडी लावण्यासाठी टोमॅटोची चटणी खाऊ शकता. यामुळे जेवणात दोन घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
ऑफिसच्या डब्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा चमचमीत भेंडी फ्राय, लहान मुलं आवडीने खातील भाजी
Raw Banana Chutney: कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी; चव अशी बोटं चाटत रहाल