Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ, पारंपरिक पदार्थ वाढवतील सणांची शोभा

गौराईच्या नैवेद्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरात दुधपुआ बनवू शकता. कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. दूध आणि तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेला पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2025 | 02:40 PM
गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ

गौराईच्या नैवेद्यासाठी दुधापासून झटपट बनवा चविष्ट दूधपुआ

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. गणपती बाप्पाचे सगळीकडे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. गणपती आल्यानंतर तीन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. गौरी पूजन करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात जेष्ठ गौरीचे आगमन झाल्यानंतर अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ दुधपुआ.याआधी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला मालपुआ खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला दुधपुआ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थासाठी जास्त साहित्य आणि वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया दुधपुआ बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला प्रिय असलेली गोड तेलपोळी कशी तयार कराल? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

साहित्य:

  • दूध
  • साखर
  • तांदळाचे पीठ
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • पाणी
गणपती बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांसोबत झटपट बनवा साजूक तुपातील अक्रोडचा हलवा, नोट करा रेसिपी

कृती:

  • दुधपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करून घ्या.
  • कढईमध्ये दूध उकळवण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार साखर, सुका मेवा आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • दूध घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून दूध थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • पॅन गरम करून त्यात तूप टाका आणि तांदळाचे पीठ गोलाकार पसरवून दुधपुआ बनवून घ्या.
  • दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर काढा. ताटात तांदळाचा तयार केलेला दुधपुआ घेऊन त्यावर तयार केलेले दूध ओतून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला दुधपुआ. हा पदार्थ राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आवडीने बनवून खाल्ला जातो.

Web Title: How to make dudhpua at home ganesh chaturthi special recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2025
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
3

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
4

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.