
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा झणझणीत मसालेदार सूप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहींना सतत सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण नेहमीच मेडिकलमधील गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. गोळ्या खाल्ल्यामुळे काही वेळेपुरता आराम मिळतो. मात्र पुन्हा एकदा खोकला किंवा सर्दी होते. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आलं लसूणचा वापर करून झणझणीत सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आलं लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. घशात वाढलेली खवखव किंवा सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी लसूण आणि आलं खाल्लं जाते. या पदार्थांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. चला तर जाणून घेऊया मसालेदार सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)