लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. भाज्यांची नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. पण भाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. बऱ्याचदा सकाळच्या घावपळीमध्ये डब्यासाठी नेहमीच काय भाजी बनवावी, असे अनेक प्रश्न पालकांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही शिमला मिरचीची चविष्ट चटणी बनवू शकता. यापूर्वी तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. याशिवाय भाकरी किंवा भातासोबत तुम्ही शिमला मिरचीची चटणी खाऊ शकता. नेहमीच घरात कांदा, बटाटा, टोमॅटो, पत्ताकोबी, फुलकोबी खाऊन कंटाळा आल्यानंतर शिमला मिरचीची चटणी बनवावी. चला तर जाणून घेउया शिमला मिरचीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
श्रावणातील उपवासाच्या दिवशी घरी बनवा कुरकुरीत रताळ्याचे काप, घरातील सगळ्यांचं आवडेल पदार्थ
नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या, नोट करून घ्या पदार्थ