Undhiyo Recipe : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत तुम्ही दया बेनला गुजरातची फेमस डिश उंधियो बनवताना अनेकदा पाहिलं असेल. मिश्र भाज्यांपासून तयार होणारी ही डिश हिवाळ्यातील एक लोकप्रिय डिश आहे.
रेसिपी थोडी वेळखाऊ असली तरी याची चव मनाला भिडणारी आहे
गुजरातमध्ये हिवाळ्याचे आगमन झाले की बाजारात ताज्या भाज्यांची रेलचेल सुरू होते आणि याच मोसमात बनवला जाणारा सर्वात खास आणि परंपरागत पदार्थ म्हणजे उंधियू. हा पदार्थ फक्त एक भाजी नाही, तर विविध भाज्या, मसाले आणि मेथीच्या मुठियांचे अप्रतिम मिश्रण आहे. मंद आचेवर झाकून शिजवल्यामुळे भाज्यांचा नैसर्गिक सुगंध आणि मसाल्यांची चव एकत्र मिसळून जेवताना एक वेगळाच अनुभव देते. गुजरातमध्ये उत्तरायणच्या दिवशी उंधियू आणि पुरीचे खास महत्त्व मानले जाते. गरमागरम उंधियू हवेतला गारवा विसरायला लावतो आणि त्यातील मेथी, तिळ, लसूण, खोबरे यांचा सुगंध घरभर पसरतो. चला याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या धुऊन मध्यम आकारात कापून बाजूला ठेवा. मेथीची पानं, बेसन, तिखट, हळद, मीठ आणि तेल एकत्र करून घट्ट गोळा बांधा आणि छोटे लाडू तयार करा.
हे लाडू हलक्या तेलात तळून घ्या किंवा वाफवूनही करू शकता. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पेस्ट, खोबरे, तिळ, तिखट, धणे–जिरे पूड, हळद, मीठ आणि साखर एकत्र करून मसाला तयार करा.
या मसाल्यात सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्या.
कढईत तेल गरम करून प्रथम शेंगा आणि कठीण भाज्या टाकून मंद आचेवर झाकून शिजू द्या. नंतर वांगी, बटाटे आणि रताळे घाला.
आता वरून मुठिया टाका आणि पुन्हा झाकण ठेवून कमी आचेवर शिजू द्या. मधूनमधून भाजी हलक्या हाताने ढवळा, पण भाज्या तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
सर्व भाज्या नरम झाल्यावर गॅस बंद करा. शेवटी लिंबाचा रस आणि ताजी कोथिंबीर घाला.
उंधियू गरम पुरी, फुलका किंवा जिरा राइससोबत अत्यंत चविष्ट लागतो. हिवाळ्यात हा पदार्थ शरीराला उब देतो.
Web Title: How to make gujrati style undhiyo at home perfect dish for winters recipe in marathi