५ मिनिटांमध्ये बनवा ओल्या हरभऱ्याचा ठेचा
जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकदा घरी मिरचीचा ठेचा बनवला जातो. पण सतत तोच तोच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. भाकरी किंवा चपाती बनवल्यानंतर घरी भाजी नसेल तेव्हा ठेचा बनवला जातो. मिरचीचा ठेचा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. पण काही वेळा सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊन पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी तिखट आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थामध्ये तुम्ही ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवू शकता. हा ठेचा बनवण्यासाठी फार कमी वेळ लागतो. ओले हरभरे आरोग्यासाठी गुणकारी आहेत. ओल्या हरभऱ्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच वजन नियंत्रणात राहते चला तर जाणून घेऊया ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.
हे देखील वाचा: अनेक आजारांवर गुणकारी आहे किचनमधील हा पदार्थ