Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाची मजा द्विगुणित करेल गव्हाच्या पिठाचे कुकीज; सुगंधित, पौष्टिक अन् पाहता क्षणी लहान मुले होतील खुश

Wheat Cookies Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार केलेले हे कुकीज पौष्टिक, सुगंधित आणि पचायला हलके असतात. चहासोबत यांची चव आणखीन छान लागेल. चला ते घरी कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 24, 2025 | 10:40 AM
चहाची मजा द्विगुणित करेल गव्हाच्या पिठाचे कुकीज; सुगंधित, पौष्टिक अन् पाहता क्षणी लहान मुले होतील खुश

चहाची मजा द्विगुणित करेल गव्हाच्या पिठाचे कुकीज; सुगंधित, पौष्टिक अन् पाहता क्षणी लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • मैद्याचे नाही यावेळी बनवा गव्हाच्या पिठाचे कुकीज
  • चवीसह पौष्टिकताही मिळेल
  • चहासोबत हे कुकीज अप्रतिम चव देतील
आपल्या घरात गरमागरम कुकीजचा सुगंध दरवळला की अगदी बालपणीच्या गोड आठवणी नकळत जाग्या होतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी सहज मिळवू शकतो, पण घरच्या घरी बनवलेली कुकीज दीर्घकाळाची उबदारता आणि आनंद देतात. लहानपणी आई किंवा आजी आम्हाला देत असलेल्या खुसखुशीत बिस्किटांची चव आजही तोंडात भरून राहते.

तोच ठराविक ढोकळा खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट पोह्यांचा ढोकळा, नोट करा रेसिपी

गहू म्हणजे आपल्या भारतीय आहारातील एक महत्त्वाचा भाग… पौष्टिक, हलका, पचायला सोपा आणि विविध पदार्थांमध्ये वापरता येणारा आहे. आज आपण याच गव्हापासून अत्यंत सोप्या पद्धतीने, कुठलेही विशेष उपकरण किंवा महागडी सामग्री न वापरता घरच्या घरी खुसखुशीत आणि चवदार गव्हाच्या पिठाच्या कुकीज बनवणार आहोत. या कुकीज नाश्त्यात, चहासोबत किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी उत्तम. चला तर मग गव्हाच्या पिठाचे हे कुकीज कसे करायचे ते जाणून घेऊया, नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य: 

  • गव्हाचे पीठ – १ कप
  • साखर – ½ कप (पावडर स्वरूपात)
  • बटर/लोणी – ½ कप (रूम टेम्परेचर)
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • वेलची पावडर – ¼ टीस्पून (ऐच्छिक पण चवदार)
  • दूध – २–३ टेबलस्पून (आवश्यकतेनुसार)
  • मीठ – चिमूटभर
  • ड्राय फ्रूट तुकडे – २ टेबलस्पून (ऑप्शनल)
आरोग्याची चिंता सोडा आवडीने मुलांना खाऊ घाला गव्हाच्या पिठाचा चविष्ट पिझ्झा; रेसिपी नोट करा

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरचे बटर घेऊन त्यात पावडर साखर घाला. दोन्ही चांगले एकत्र होईपर्यंत मिक्स करा. मिश्रण हलके, फुललेले आणि क्रीमी झाले पाहिजे.
  • एका वेगळ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • कोरडे साहित्य बटर–साखरेच्या मिश्रणात घाला. हलक्या हाताने मिसळा. आवश्यकतेनुसार थोडे थोडे दूध घालत मऊसर पण घट्ट असे पीठ तयार करा.
  • पीठाचे छोटे लिंबाएवढे गोळे करा. हलके दाबून गोल कुकीज आकार द्या. हवे असल्यास वरती ड्राय फ्रूट्स दाबा.
  • आता ओव्हन 170°C किंवा 340°F वर प्रीहीट करा.
  • कुकीज बेकिंग ट्रेमध्ये १ इंच अंतर ठेवून मांडून 12–15 मिनिटे बेक करा.
  • कडा थोड्या सोनेरी दिसू लागल्या की कुकीज तयार!
  • कुकीज पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्या अधिक खुसखुशीत होतात.
  • हवाबंद डब्यात साठवा, १०–१५ दिवस मस्त ताज्या राहतात.
  • बटरऐवजी तूप वापरले तरी चव अप्रतिम येते.
  • साखरेऐवजी गूळ पावडर वापरून हेल्दी आणि वेगळी चव मिळू शकते.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात चॉकलेट चिप्सही घालू शकता.

Web Title: How to make healthy and tasty wheat cookies at home note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • marathi recipe
  • tasty food
  • Wheat flour

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.