नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी बनवा रसरशीत जिलेबी
नवरात्री उत्सवाचा आज आठवा दिवस. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा करून गोड पदार्थ बनवले जातात. देवीच्या नैवेद्यासाठी शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. पण घाईगडबडीच्या वेळी नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही १० मिनिटांमध्ये वाटीभर मैद्याचा वापर करून रसरशीत जिलेबी बनवू शकता. जिलेबी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. जिलेबीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही जिलेबी बनवू शकता. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. पण भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया जिलेबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)