दूध न आटवता १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर सिताफळाची बासुंदी
नवरात्री उत्सवाच्या शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच प्रत्येक घरात सरस्वती देवीची पूजा केली जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ कायमच बनवले जाते. श्रीखंड-पुरी, बासुंदी, खीर, गुलाबजाम, रसगुला इत्यादी अनेक पदार्थ कायमच बनवले जातात. गोड पदार्थ बनवल्याशिवाय सण अपूर्ण वाटतात. त्यामुळे घरात काहींना काही गोड पदार्थ बनवला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बासुंदी खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच विकतची बासुंदी आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरात सोप्या पद्धतीमध्ये सीताफळ बासुंदी बनवू शकता. बासुंदी बनवताना दूध खूप जास्त वेळ आटवले जाते. पण यासाठी खूप जास्त वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये सीताफळ बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पुरीसोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)