
घरी बनवा चविष्ट केशर थंडाई, सण होईल आनंदात साजरा
संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. देशाच्या वेगवेगळ्या भागात होळी सण साजरा करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. महाराष्ट्रामध्ये एकमेकांना रंग लावून घराघरांमध्ये होळी सण साजरा केला जातो. यादिवशी प्रामुख्याने पुरणपोळी बनवली जाते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पुरणपोळी खायला खूप आवडते. याशिवाय होळीच्या दिवशी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे थंडाई. मागील अनेक वर्षांपासून होळीच्या दिवशी थंडाई बनवण्याची परंपरा आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केशर थंडाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी बनवला जातो. होळीच्या सणात आनंदाचे रंग भरण्यासाठी सगळीकडे गोड पदार्थ बनवले जातात. दुधाचा वापर करून बनवले जाणारे पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात.(फोटो सौजन्य – iStock)
शेवग्याचे सूप आरोग्यासाठी गुणकारी! ‘या’ पद्धतीने घरी बनवा पौष्टिक सूप, हाडं राहील कायम मजबूत