संध्याकाळची हलकीशी भूक भागवण्यासाठी घरी बनवा High Protein Salad
संध्याकाळी सगळ्यांचं हलकीशी भूक लागते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? हे अनेकांना सुचत नाही. कामावरून थकून घरी आल्यानंतर किंवा इतर वेळी बाहेरून जाऊन आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरगुती बनवलेलं पौष्टिक पदार्थ खावेत. सॅलड, स्मूदी किंवा फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय आरोग्यासाठी प्रोटीन सॅलड अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.(फोटो सौजन्य – iStock)
शेवग्याचे सूप आरोग्यासाठी गुणकारी! ‘या’ पद्धतीने घरी बनवा पौष्टिक सूप, हाडं राहील कायम मजबूत






