
उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वाढत्या गर्मीमुळे अंगाची काहिली होते. सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड वाढते आणि खूप जास्त कंटाळा येतो. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्यामुळे पाण्यासोबतच आवश्यक क्षारांची पातळ सुद्धा कमी होऊन जाते. ज्याचा आरोग्यावर लगेच परिणाम होतो. खूप जास्त घाम आल्यामुळे थकवा, अशक्तपणा येऊन चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर आतून थंड ठेवणे फार आवश्यक आहे. पाणी पिण्यासोबतच वेगवेगळ्या शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांचे सुद्धा सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ‘खरबूज-पुदिना कूलर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे थंड प्यायल्यानंतर शरीरात थंडावा टिकून राहील आणि पाण्याच्या पातळी कायमच संतुलित राहील. या दिवसांमध्ये शरीर ताजेतवाने असणे फार आवश्यक आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात विविध फळे उपलब्ध होतात. या फळांपासून तुम्ही सरबत किंवा कोणतेही मॉकटेल बनवू शकता. चला तयार जाणून घेऊया खरबूज-पुदिना कूलर बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी