
सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट मेथीचे पराठे
पोषक तत्वांनी समृद्ध असलेली मेथीची भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. पण मेथीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असल्यामुळे अनेक लोक मेथी खाणे टाळतात. पण मेथीच्या भाजीमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळून येतात. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मेथीच्या भाजीपासून भाकरी,दही-धपाटे इत्यादी अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना डब्यात मेथीची पराठे बनवून देऊ शकता. मेथीचे पराठे बनवण्यासाठी अगदी सोपे असल्यामुळे कमीत कमी वेळात आणि साहित्यमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीचे पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)