फोटो सौजन्य - Social Media
जगामध्ये खवय्यांची कमी नाही आहे. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खवय्ये सापडतात. त्यातील एक प्रकार म्हणजे शाकाहारी. विविध प्रकारच्या भाज्या खाणे आणि त्यातून सुखी राहणे, हा शाकाहारी लोकांचा गुणधर्म असतो. पनीरपासून बनलेले वेगवेगळे रेसिपीज म्हणजे यांचे जीव कि प्राण असतो. खवय्यांच्या दुसरा प्रकार म्हणजे मांसाहारी. अंडे, चिकन, मटण म्हणजे यांच्यासाठी आयुष्य असते. काही लोक इतके मांसाहारी असतात कि मांस खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. तर काही मांसाहारी लोकं वार बघून आज मांसाहार करायचा कि शुद्ध शाकाहारी जेवण्याचा बेत करायचा? यावर अवलंबून असतो. असो, पण यामध्ये, आपल्याला सोशल मीडिया आणि सोशल लाईफमध्येसुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमध्ये वादविवाद पाहायला मिळतात.
शाकाहारी जेवण जास्त निरोगी का मांसाहारी जेवण जास्त निरोगी असते? या प्रश्नावर शाकाहारी आणि मांसाहारी नेहमी वाद घालत असतात. तर याचे उत्तर देणे तर कठीण आहे. परंतु, दोन्ही अन्न प्रकारच्या सेवनाने होत असलेल्या फायद्यांवरून आपण याचा अंदाज बांधू शकतो कि कोणत्या अन्न प्रकारातून आपल्याला जास्त पोषकतत्वे मिळत आहेत आणि आपल्याला शरीराला जास्त फायदा होत आहे. महत्वाची गोष्ट अशी कि आपण किती निरोगी आहोत? या गोष्टी फक्त आपण खात असलेल्या अन्नपदार्थांवर अवलंबून नसून आपली जीवनशैली, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, आणि आनुवंशिकता असे विविध घटक आपल्या निरोगीपणाला कारणीभूत असतात.
शाकाहार केल्याने व्यक्ती हृदयविकाराच्या धोक्यापासून लांब राहतो. तसेच शाकाहारी व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असते. भाज्या, फळे, धान्य, आणि कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. शाकाहार केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. शाकाहारी अन्नामध्ये अधिक अँटिऑक्सिडंट आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात. शाकाहारी लोक सहसा वजनाच्या बाबतीत नियंत्रित असतात आणि त्यांचे आयुर्मान मांसाहारी लोकांच्या तुलनेत अधिक असू शकते.
मांसाहार करण्याचेही अधिक फायदे आहेत. मांसाहारी अन्नामध्ये प्रोटीनचे प्रमाण फार असते. मांस, मासे आणि अंडी हे उच्च गुणवत्तेचे प्रोटीन आणि जीवनसत्त्वे प्रदान करतात. विशेषतः B12 व्हिटॅमिन आणि D व्हिटॅमिन प्रदान केल्याने स्नायूंची वाढ होते आणि निरोगी त्वचा मिळते. मांसाहार केल्याने हेम आर्यनचे प्रमाण वाढते. माशांमध्ये ओमेगा ३ तसेच फॅटी ऍसिड असल्याने, याचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते. मांसाहारी आहारात अधिक वैविध्यता असू शकते, ज्यामुळे आवश्यक पोषक तत्वे पटकन मिळू शकतात.
हे देखील वाचा : वितळलेल्या मेणबत्तीपासून घरच्या घरी वस्तू बनवण्यासाठी वापर करुन बघा
शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही आहारपद्धतींचे फायदे आहेत, मात्र कोणता आहार अधिक निरोगी आहे हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैली आणि त्यांच्या शरीराच्या आवश्यकतांवर अवलंबून असते. शाकाहारींमध्ये हृदयरोगाचा धोका कमी असतो तर मांसाहार प्रथिने आणि विशिष्ट जीवनसत्त्वे पुरवतो. योग्य प्रमाणात संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हा कोणत्याही आहाराचा मुख्य घटक असावा.