सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस
निरोगी आरोग्य जगण्यासाठी अनेक लोक सतत काहींना काही करत असतात. दैनंदिन आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, नेहमी आनंदी रहाणे, भरपूर पाणी पिणे इत्यादी गोष्टी केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. पण काही लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. असे केल्यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अनेकदा नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही हाय प्रोटीन ओट्स कअर्ड राईस बनवू शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा