वजन झपाट्याने कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी प्या चविष्ट ओट्स सूप
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. तासनतास व्यायाम, विविध सप्लिमेंट, महागडे डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण सतत व्यायाम आणि चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शारीरिक आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा वजन कमी करताना रात्रीच्या जेवणात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी अनेक लोक सॅलड किंवा सँडविच खाऊन राहतात. पण यामुळे शरीरात अशक्तपणा किंवा थकवा वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी ओट्स सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते. याशिवाय वजन कमी करताना रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. सूप प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया ओट्स सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






