
खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी
साऊथ इंडियन पदार्थ बनवल्यानंतर कायमच घरात खोबऱ्याची चटणी बनवली जाते. खोबऱ्याची खमंग चटणी आप्पे, डोसा, इडली इत्यादी पदार्थांसोबत सुंदर लागते. याशिवाय जेवणात भाजी नसल्यास झणझणीत सुक्या खोबऱ्याची किंवा ओल्या खोबऱ्याचा किस वापरून चटणी बनवली जाते. पण सतत खोबऱ्याच्या चटणीचे सेवन केल्यास अपचन आणि ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गॅसचा वापर न करता झणझणीत कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कांदा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी आहे. जेवणात तोंडी लावण्यासाठी कांदा, लिंबू खाल्ला जातो. झणझणीत कांद्याची चटणी गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. लहान मुलं जेवणातील कांदा खाण्यास नकार देतात, अशावेळी मुलांना कांद्यापासून असे नवनवीन पदार्थ खाण्यास द्यावेत. तुम्ही बनवलेली कांद्याची चटणी घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया झणझणीत कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
भाजी-चपातीसोबत खा ‘या’ गोष्टी! तद्न्य काय म्हणतात? वाचा