गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर प्रामुख्याने शेवयांची खीर, तांदळाची खीर किंवा बाजारातील मिठाई आणून खाल्ली जाते. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याचा वापर करून खीर बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री उपलब्ध असतात. संत्री खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चवीला आंबट गोड असलेली संत्री अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही या पद्धतीने संत्र्याची खीर बनवू शकता. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया संत्र्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी