भारती सिंग मुलाला देते 'या' पदार्थांपासून बनवलेले हेल्दी होममेड चॉकलेट
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. अनेकदा चॉकलेट पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आवरत नाही. चॉकलेट खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डार्क चॉकलेटचे सेवन करावे. लहान मुलं बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा इतर वेळी चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. पण नेहमी नेहमी चॉकलेट खाल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंग तिच्या मुलाला देत असलेले होममेड चॉकलेट कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. होममेड पद्धतीने तयार केलेले चॉकलेट लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. लहान मुलांना हेल्दी व पौष्टीक होममेड ड्रायफ्रुटस चॉकलेट्स खाण्यास द्यावे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला पोषण मिळेल. भारती सिंग नेहमीच तिच्या मुलाला घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खाण्यास देते. चला तर जाणून घेऊया होममेड हेल्दी आणि पौष्टिक ड्रायफ्रूट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
वाटीभर नाचणीच्या पिठाच्या वापर करून बनवा चविष्ट केक, वाढलेले वजन राहील नियंत्रणात
Chocolate Day 2025: कधीपासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला? चॉकलेट डेचा गोड इतिहास जाणून घ्या