
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट 'पनीर डोसा'
दिवसभरातील अतिशय महत्वाचे जेवण म्हणजे नाश्ता. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी नाश्ता केला जातो. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, साधा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पनीर डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाल्ल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. बऱ्याचदा वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता केला जात नाही. पण असे न करता सकाळच्या नाश्त्यात पोटभर अन्नपदार्थ खावेत. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे मूड सुधारतो, चयापचय सुधारते आणि वाढलेले वजन नियंत्रणात राहते. नाश्ता करणे ही आरोग्यदायी सवय आहे. पनीर डोसा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही पनीर डोसा बनवू शकता. हा डोसा लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना घेऊन जाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया पनीर डोसा बनवण्याची सोपी रेसिपी. सौजन्य(फोटो – pinterest)
५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं, वरण भाताला येईल रंगतदार चव
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी