५ मिनिटांमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून बनवा चटपटीत झणझणीत लोणचं
जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. आंबट गोड तिखट चवीचे लोणचं खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. लोणचं पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंब्याचे लोणचं, गोड लोणचं, लिंबाचं लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवली जातात. पण कायमच आंबट लोणचं खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही झणझणीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही हिरव्यागार मिरच्यांपासून ५ मिनिटांमध्ये लोणचं बनवू शकता. जेवणाच्या ताटात मिरचीचं लोणचं असेल तर वरण भात अतिशय सुंदर लागतो. मिरचीच्या लोणच्यामुळे तोंडाची चव वाढते. कायमच बाजारात विकत मिळणारी लोणचं आणण्यापेक्षा घरी बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. विकतच्या लोणच्यात आंबटपणा वाढवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला कोणत्याही विकतच्या पदार्थांचा वापर न करता झणझणीत मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
दिवसाची सुरुवात होईल आनंदी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ताकातलं धिरडं, नोट करून घ्या रेसिपी






