विकतंच कशाला आता घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा Peanut Butter, फक्त 4 साहित्यांपासून होईल तयार
हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यासाठी पीनट बटर एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. शेंगदाण्यांपासून बनवले जाणारे हे पीनट बटर ब्रेडवर स्प्रेड करून खाल्ले जाते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये पीनट बटरचा समावेश केला जातो. आरोग्यसाठी हा खूप फायदेशीर असतो आणि बहुतेकदा हा बाजारातून खरेदी केला जातो. याची चव अप्रतिम लागते आणि ब्रेडसोबत त्याची आणखीन द्विगुणित होते. पण तुम्हाला माहित आहे का? स्वादिष्ट चवीचं हे हेल्दी पीनट बटर घरी अगदी सहज आणि झटपट बनवलं जाऊ शकतं.
१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्टाईल शेंगदाण्याची चिक्की, उपवासासाठी बनवा स्पेशल पदार्थ
बाजारातून मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अनेक वेळा प्रिझर्व्हेटिव्ह्ज, साखर आणि हानीकारक तेल वापरलं जातं. मात्र आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने, कुठलेही रसायन न वापरता स्वादिष्ट आणि हेल्दी पीनट बटर तयार करू शकतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार साहित्यांचीही आवश्यकता भासत नाही. काही निवडक साहित्यापासूनच तुम्ही चविष्ट असे पीनट बटर तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
पीनट बटर हेल्दी आहे का?
होय, पीनट बटरमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असल्यामुळे ते सामान्यतः निरोगी मानले जाते.
पीनट बटर खाण्याचे काही आरोग्य फायदे आहेत का?
हो, याचा आरोग्याला अनेक फायदा होतो ज्यात हृदयाचे आरोग्य सुधारणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारणे आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होणे यांचा समावेश आहे.