१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्टाईल शेंगदाण्याची चिक्की
लोणावळ्याला फिरायला गेल्यानंतर सगळ्यात आधी आठवणीत येणारा पदार्थ म्हणजे लोणावळा स्पेशल चिक्की. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चिक्की खायला खूप आवडते. शेंगदाणा चिक्की, राजगिऱ्याची चिक्की, तिळाची चिक्की इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की बाजारात उपलब्ध आहेत. मात्र नेहमीच बाजारात विकत मिळणारी चिक्की आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेली चिक्की खावी. उपवासाच्या दिवशी नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही शेंगदाण्याची चिक्की खाऊ शकता. याशिवाय शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खावेत. तसेच या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये लोणावळा स्टाईल शेंगदाणा चिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Raksha Bandhan 2025 : सणाचा गोडवा आणखीन वाढेल, खास दिवशी भावासाठी घरीच बनवा मऊसर ‘मिल्क केक’