
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटपटे आलू, साध्या मसाल्यांपासून बनवलेली चविष्ट रेसिपी
प्रत्येक स्वयंपाक घरात बटाटा हा पदार्थ कायमच उपलब्ध असतो. लहान मुलांना भाजलेला किंवा शिजवलेला बटाटा खायला खूप जास्त आवडतो. बटाट्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फ्राईज, आलू मसाला, पोटॅटो ट्विस्टर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी लहान आकाराच्या बबट्यांपासून चटपटे आलू बनवू शकता. स्वयंपाक घरातील साधे मसाले फारच चविष्ट आणि टेस्टी असतात. सर्व मसाले एकत्र करून बनवलेला चटपटीत पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप आवडीने खातील. हा पदार्थ गरमागरम चपातीसोबत किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. काहींना चटपटीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. अशावेळी नवीन काही खायचे असेल तर तुम्ही चटपटे आलू बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चटपटे आलू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)